Pimpri political News : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीसाठी चांगले वातावरण; एक दिलाने काम करा – शरद पवार
शहरातील पदाधिका-यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष संघटनेचे चांगले काम सुरु आहे. संघटना अधिक बळकट करावी. शहरात पक्षासाठी चांगले वातावरण आहे. महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी करावी. सर्वांची एकी कायमस्वरुपी ठेवावी. एक दिलाने काम करावे. पक्षासाठी मेहनत करणा-यांना नक्कीच फळ मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरातील पदाधिका-यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह शहरातील पदाधिका-यांनी आज (सोमवारी) शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदिश शेट्टी, राहुल भोसले, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, पंकज भालेकर, विनोद नढे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे आदी उपस्थित होते.










Leave a Reply