Pimpri News : पीएमपीएमएलच्या ११७ कर्मचाऱ्यांना पिंपरी महापालिकेत सामावुन घेण्याचा मार्ग मोकळा

Pckhabar- पीएमटी व पीसीएमटी यांचे एकत्रीकरण करुन दोन्ही शहरातील प्रवाशांच्या सेवेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांची या महामंडळात नेमणूक करण्यात आली. त्यातील ११७ कर्मचारी आजही पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करीत आहेत मात्र त्यांची अस्थापना पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(पीएमपीएमएल) कडे आहे. या ११७ कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत समावुन घेणेबाबत शासनाने मान्यता दिल्याने या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना महापौर म्हणाल्या की, सन २००१ पासुन पुणे महानगर पहिवहन महामंडळाचे जवळपास २३५ कर्मचारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात काम करत होते. त्यातील सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त वगळून ११७ चतुर्थ श्रेणीतील शिपाई, हेल्पर, क्लिनर, वाहन चालक, लेबर यांच्यासह अन्य पदनामाचे कर्मचाऱी अद्यापही महापालिका सेवेत विविध विभागात काम करीत आहेत. हे सर्व कर्मचारी पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करतात व त्यांना त्यांचे वेतन, भत्ते पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून अदा करण्यात येत आहे. तथापि या कर्मचाऱ्यांना द्यावी लागणारी वेतनापोटीची रक्कम ही महापालिकेला दरमहा पीएमपीएमएलकडे पाठवून द्यावी लागत आहे.










Leave a Reply