Pune District News : वाचनवेड संस्थेतर्फे खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पवारवाडी खालुंब्रे येथे पुस्तकांचे वाटप
देहू येथील अभंग प्रतिष्ठाणचा पुढाकार

Pckhabar- पुणे येथील वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून व देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या पुढाकारातून खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पवारवाडी खालुंब्रे शाळेत अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली.
पवारवाडी खालुंब्रे येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमप्रसंगी अमोल दादा पवार मा. उपसभापती खेड, गणेश बोत्रे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, चंद्रभागा बोत्रे उपसरपंच, सुनीता पवार मा.उपसरपंच, सुरेखा खंडवे ग्रामपंचायत सदस्या,अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मोरे , तात्याबा खंडवे मा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, अमित गायकवाड सचिव, अतुल पवार , संतोष भसे , रवींद्र काळोखे , विजय ठाणगे सागर मोरे, अजिंक्य साकोरे , चंदन सुतार. सचिन कुंभार इ.मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात. परंतू अवांतर वाचनासाठी वाचनसाहित्य उपलब्ध होत नाही.
वाचनवेड संस्थेचे प्रमुख किरीट मोरे,मयूर सेठ यांच्या माध्यमातून हर्षद सुराणा, सांभव भाटिया, दिपेन जैन तसेच संतोषी मित्र मंडळ, पुणे यांच्या सहकार्यातून सदर पुस्तके सर्व शाळांसाठी उपलब्ध करुन दिली.
यावेळी मा. उपसभापती अमोल पवार मराठी दिनानिमित्त शाळेला दिलेली पुस्तकरूपी भेट शाळेसाठी एक अनमोल ठेवा आहे. त्याबद्दल त्यांनी वाचन वेड संस्था व अभंग प्रतिष्ठान या संस्थांच्या सदस्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक अतुल सोनवणे यांनी केले. तर आभार उपसरपंच चंद्रभागा बोत्रे यांनी मानले.











Leave a Reply