
Dehugaon News : रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 63 जणांचा सहभाग
Pckhabar- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंद्रायणीनगर, देहूगांव मध्ये रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 63 जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाला देहूगांव चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, उपगराध्यक्ष यांच्या वतीने स्वप्नील आप्पा काळोखे, नगरसेवक बंडाभाऊ काळोखे, योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, मीना कुऱ्हाडे, रुपेश सोनुने, माजी उपसरपंच सचिन कुंभार, युवा उद्योजक अनिकेत काळोखे,वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, डॉ प्रमोद लोहार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सोसायटीच्या कामाचे कौतुक केले.
आपण समाजासाठी काहीतरी देणं लागत या उद्देशाने इंद्रायणीनगर कमिटीने शिबिराचे आयोजन केले होते. यातून समाजसेवा घडत असताना एखाद्याचे प्राण वाचू शकतात ही निःस्वार्थी भावना ठेवून लोकांनी रक्तदान केले. इंद्रायणी नगर सोसायटी कमिटी नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. यातून काहीतरी समाजात चांगला संदेश जाऊन एक समाजसेवा घडत असते, असा कमिटीचा उद्देश असतो. या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला एकूण 63 लोकांनी रक्तदान केले.
यासाठी सर्व इंद्रायणीनगर कमिटीने आयोजन केले. सर्व कमिटी सभासद दीपक साळवे, रमेश चव्हाण, नवनाथ गायकवाड, पंढरीनाथ माळी, सुनील निकम, रमेश यादव, अंकुश पवार, दत्ता गाढवे, राहुल सूर्यवंशी,महादेव सुतार, सागर लढे यांनी मेहनत घेऊन आयोजन केले. सर्व मान्यवरांचे नवनाथ गायकवाड यांनी अभिनंदन केले आणि तसेच रक्तदात्याचे आभार मानले.











Leave a Reply