Pimpri News : मावळ तालुक्यात तब्बल सव्वा कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

Pimpri News : मावळ तालुक्यात तब्बल सव्वा कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

 

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्याला मिळाला सर्वाधिक निधी

 

 

 

Pckhabar – मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यात शनिवारी (दि. २६) सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. मूलभूत प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील काही दिवसात चांगले रस्ते आणि विविध सुविधा नागरिकांसाठी तयार होणार आहेत.

भूमिपूजन समारंभासाठी गावचे सरपंच ग्रामस्थ व शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, महिला संघटीका शैलेजा खंडागळे, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब पाठक, सुरेश गायकवाड, अनिता गोंते, ज्ञानेश्वर गुंड, अशिष ठोंबरे, मदन शेडगे, डॅा. विकेश मुथा, सतिश इंगवले, गिरीष सातकर, विजय सातकर, गणेश भोकरे, शंकरराव गाडे, नवनाथ हरपुडे, संजय भोईर, सुनिल येवले, अमित कुंभार, दत्ता भेगडे, धनंजय नवघने, राम सावंत आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा नियोजन विभागांतर्गत मावळ तालुक्यांतील डोंगरगाव, कुसगाव बु:,कामशेत, कान्हेगाव, सोमाटने या गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शासनाने सर्वाधिक निधी मावळ तालुक्याला दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विनंतीनुसार पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्याला पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातील सव्वा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना, तसेच नागरिकांना ज्या ठिकाणी गैरसोय होत होती अशा कामांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. भविष्यात ग्रामीण भागातील रस्त्याच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *