Maval political News : संकटाचा काळ संपून मावळच्या प्रगतीचा काळ सुरू ; सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळचा विकास : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Maval political News :
संकटाचा काळ संपून मावळच्या प्रगतीचा काळ सुरू ; सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळचा विकास : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Pckhabar- आमदार सुनील शेळके जवळपास १ लाख मतांच्या लीडने निवडून आले असून मावळवासियांचे आभार मानतो. आमदार शेळके यांनी आजवर आपल्या मतदारसंघासाठी ९०० कोटींचा निधी मिळवला आहे. अजून अडीच वर्षे बाकी आहेत. अण्णा हा माणसासाठी झटणारा नेता आहे. संकटाचा काळ संपून मावळच्या प्रगतीचा काळ सुरू झाला आहे. सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळचा विकास नक्की होईल असा विश्वास, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात (शनिवारी) दिवशी प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषद निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले आहे.

यावेळी ना. जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एक एक कार्यकर्ता जोडला जात असून आज आपला पक्ष तळागाळात उभा होत आहे. आज पक्षाकडे तरुणांची मोठी फळी निर्माण झाल्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा राष्ट्रवादीमय असणार असा विश्वास ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आपल्या पक्षात आता सुनील शेळके, रोहित पवार, निलेश लंके असे तरुण लोक जबाबदारीने नेतृत्व करत आहेत. तुमच्या सर्वांच्या ताकदीने सुनील अण्णा जवळपास १ लाख मतांच्या लीडने निवडून आले आहेत असे बोलून जयंत पाटील यांनी सर्व मावळवासियांचे आभार मानले. तसेच आमदार सुनील शेळके यांनी आजवर आपल्या मतदारसंघासाठी ९०० कोटींचा निधी मिळवला आहे. अजून अडीच वर्षे बाकी आहेत. अण्णा हा माणसासाठी झटणारा नेता आहे. संकटाचा काळ संपून मावळच्या प्रगतीचा काळ सुरू झाला आहे. सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळचा विकास नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मावळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीला आमदार सुनील अण्णा शेळके, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, महिला सरचिटणीस संगिता साळुंके, तालुकाध्यक्ष बबन भेगडे, तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *