Pimpri political News : पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची झोप उडवण्यासाठी मी पूर्णपणे वेळ देणार : खासदार डॉ. अमोल कोल्हे


Pimpri political News : पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची झोप उडवण्यासाठी मी पूर्णपणे वेळ देणार : खासदार डॉ. अमोल कोल्हे

Pckhabar- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची झोप उडवण्यासाठी मी पूर्णपणे वेळ देईन, असे आश्वासन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज (शनिवार) पाचव्या दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी खासदार डॉ कोल्हे बोलत होते.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त  प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील  ज्या पद्धतीने राज्यभरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत त्या बदल त्यांचे मी आभार मानतो.  सत्ताधारी पक्षाची झोप उडवण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेसाठी मी पूर्णपणे वेळ देईन, असे आश्वासन खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *