Mumbai News : आयुर्वेद हे सर्वांगीण परंपरागत शास्त्र: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांच्या हस्ते डॉ. अंकुश जाधव यांच्यासह २० व्यक्तींना कोविड प्रतिबंधक आयुरक्षा किटचे वाटप

Pckhabar- “आयुर्वेद हे आपले सर्वांगीण परंपरागत शास्त्र असून अनेक रोगांवर यात उपचार असून पुढे येणाऱ्या रोगांवर ही या उपचार पद्धतीचा उपयोग करून आपण मात करू शकतो” असे उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय आयुर्वेद संशधन संस्थेच्या वतीने राज भवनात आयोजित केलेल्या कोविड प्रतिबंधक “आयुरक्षा किट” वाटप अभियानाचा शुभारंभ करताना राज्यपाल बोलत होते.
या “आयुरक्षा किट” मध्ये संशमनी वटी,च्यवनप्राश, आयुष काढा व अणूतेल या औषधांचा समावेश आहे. राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. अंकुश जाधव यांच्यासह
२० व्यक्तींना कोविड प्रतिबंधक आयुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, मुंबईचे प्रमुख डॉ. गोविंद रेड्डी यांनी अभियानाचा उद्देश समजावून सांगितला.
या प्रसंगी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन परिषद मुंबई चे प्रमुख डॉ.दीपक राऊत यांनी या संस्थेने कोविड काळात केलेल्या कार्याचे कौतुक केले.
संस्थेचे वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. मनोहर गुंडेटी यांनी आभार मानले.










Leave a Reply