Dehu News : देहूत उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

Dehu News : देहूत उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

इंद्रायणीनगर सोसायटीच्या वतीने आयोजन

Pckhabar- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून देहू येथील इंद्रायणीनगर सोसायटीमध्ये उद्या (रविवार) रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या रक्तदान मधून आपल्या मुळे काहीतरी सेवा घडत आहे, कुणाचे तरी प्राण वाचणार आहे, ही भावना ठेवून नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन इंद्रायणीनगर सोसायटीच्या वतीने आले आहे. रक्तदात्यास कधीही आणि कुठेही महाराष्ट्रात urgent रक्ताची गरज लागल्यास त्वरित रक्त देण्यात येणार आहे.

तसेच प्रत्येक रक्तदात्यास सर्टिफिकेट, टिफिन सेट भेट म्हणून देण्यात येणार आहे.

स्थळ -इंद्रायणीनगर सोसायटी, गाथा मंदिराजवळ, देहूगांव
वेळ – रविवारी 27/2/2022
सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *