Maval News : उषाताई भोईटे यांना जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार जाहीर
भोईटे यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण राबवले उपक्रम

Pckhabar- विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या धानगव्हाण जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ.उषाताई विक्रम भोईटे यांना पुणे जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल देहूमध्ये व मावळ तालुक्यात सर्वत्र त्यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक होत आहे.
उषा भोईटे या सध्या मावळ तालुक्यातील धानगव्हाण जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या अगदी तळमळीने विविध उपक्रम घेऊन मुलांना अध्ययन करतात. तसेच भोईटे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत
विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
उषा विक्रम भोईटे
जि प प्राथ शाळा धानगव्हाण
केंद्र – कडधे ता. मावळ ,पुणे
एकूण सेवा – १४ वर्षे ४ महिने
शिक्षण – एम ए, डी एड, डी एस
एम, एम फिल,पी एच
डी (aappiar)
मिळालेले पुरस्कार –
•२०१६-१७ मध्ये उल्लेखनीय शिक्षण कार्याबद्दल आपल घर पुणे तर्फे नवी दिल्ली येथे पुरस्कार
•२०१८-१९ मध्ये मावळ तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार
•२०१७-१८ मध्ये मावळ तालुका अंतर्गत खासदार पुरस्कार
• २०१८-१९ मध्ये लीफफॉरवर्ड तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार
उल्लेखनीय बाबी-
• रविवार माझ्या आवडीचा हा उपक्रम तालुका स्तरावर राबविला जातो
• २०१८-१९ मध्ये लिपफॉरवड तर्फे आदर्श शाळा पुरस्कार
• कृतियुक्त अध्यपणवर भर
• आँनलाईन शिक्षण यशस्वी होण्यासाठी कृतीयुक्त व्हिडिओ निर्मिती
• आँनलाईन विविध स्पर्धा










Leave a Reply