Pimpri News : शहरातील १३ हजार जणांना कर भरण्याच्या नोटिसा

Pimpri News : शहरातील १३ हजार जणांना कर भरण्याच्या नोटिसा

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात एकूण साडेपाच लाख मालमत्ता आहेत. एक लाखापेक्षा जास्त मालमत्ताकर असलेल्यामध्ये २७ हजार ७१४ मोठ्या थकबाकीधारकांचा समावेश आहे. औद्योगिकसह निवासी आणि बिगरनिवासी मालमत्तांचा समावेश आहे. महापालिका करसंकलन विभागाने सुमारे १३ हजार मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.

कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर पाहायला मिळाला आहे. तसेच याचा परिणाम विकासकामांवर होणार आहे. उत्पन्न वाढीसाठी करसंकलन विभागाला करवसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त कर वसुली अभिप्रेत आहे. करसंकलन विभागामार्फत थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.

करसंकलन विभागाकडील आकडेवारीनुसार एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या २७ हजार ७१४ इतकी आहे. त्यामध्ये एक ते पाच लाख रुपयांपर्यंत मालमत्ताकर थकबाकीदारांची संख्या २० हजार ५६१ इतकी आहे. त्यामध्ये निवासी मालमत्ताधारक १० हजार ६००, औद्योगिक ६ हजार ६१८ आणि मिश्र ३ हजार ३४३ थकबाकीदारांचा समावेश आहे. पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या ४ हजार १५३ इतकी आहे. त्यामध्ये निवासी १ हजार २७९, बिगरनिवासी १ हजार ६१२, मिश्र ९२९ आणि औद्योगिक ३३३ मालमत्तांचा समावेश आहे. त्यांच्याकडून थकबाकी मालमत्ताकर वसुलीचे आव्हान करसंकलन विभागापुढे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *