Pimpri News : कन्या विद्यालयात शिवजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न

Pimpri News : कन्या विद्यालयात शिवजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत स्वराज्य रक्षक , रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे व पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. अनेक गड किल्ले, मुलुख जिंकून रयतेला सुखी ठेवण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. शिवाजी महाराजांच्या ठिकाणी असलेली संघटन शक्ती, स्वराज्य विस्ताराचा ध्यास , पराक्रम , शौर्य या गुणांची ओळख व्यक्त केली.

यानंतर इयत्ता 5 वी व 9 वी ब च्या वर्गातील विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांचे चरित्र , पराक्रम याविषयी माहिती देणारी भाषणे केली. इयत्ता नववी ब , सहावी अ, मधील विद्यार्थिनींनी शिवजयंती चा पाळणा सादर केला व तसेच शिवाजी महाराजांच्या कार्याची महती विशद करणारा पोवाडा देखील इयत्ता 9 वी ब व आठवी अ मधील विद्यार्थिनींनी सादर केला . तसेच इयत्ता 8 वी ब मधील विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांचे बालपण याविषयावर आधारित नाटिका सादर केली. तसेच इयत्ता 5 वी व 6 वी च्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.

विद्यालयातील उपशिक्षिका भंडारे स्वाती, मीनल साकोरे, प्रीतम फिसरेकर तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे व पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले .तसेच या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिसरेकर प्रीतम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *