Talegaon Dabhade News : श्री गजानन महाराज प्रगट दीन सोहळा उत्साहात साजरा
यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने सोहळ्याचे आयोजन

Pckhabar- तळेगाव दाभाडे, यशवंत नगर यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्री गजानन महाराज प्रगट दीन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रतिष्ठानच्या वतीने सकाळपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ह. भ.प ज्ञानेश्वर महाराज दौडकर यांच्या कीर्तन प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. संतकृपा अन्नदान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी किर्तनसाथ दिली. या कीर्तनाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रींची महाआरती जेष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवरे, नगरसेवक निखिल भगत, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे, भाजप शहर अध्यक्ष रवींद्र माने, अनिकेत भेगडे, ॲड. संविद पाटील यांच्यासह यशवंत प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.











Leave a Reply