RTE News : ‘आरटीई’साठी शहरात ३३२४ जागा उपलब्ध

Pckhabar- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत – (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाइन शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावर्षी १७० शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत, तर शहरात ३ हजार ३२४ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. तथापि, विद्यार्थी आणि पालकांच्या सोयीसाठी महापालिका शिक्षण प्रवेशासाठी विभागाने १० मदत केंद्रे जाहीर केली १० मदत केंद्रे आहेत. ‘आरटीई’ कायद्यानुसार शहरातील १७० शाळांची नोंदणी झाली आहे. या शाळांमध्ये एकूण ३ हजार ३२४ इतक्या जागा ‘आरटीई’ प्रवेशासाठी राखीव ठेवल्या आहेत. ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी http://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा दिलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील १८० शाळांची नोंदणी करण्यात आली होती, तर प्रवेशाच्या ३ हजार ४६४ जागा उपलब्ध होत्या. यंदा आरटीईच्या शाळांची नोंदणी संख्या दहाने कमी झाली आहे.
‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेकरिता विद्यार्थी आणि पालकांना आवश्यक मदतीसाठी १० मदत केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये वसंतराव पाटील मुले/ मुलींची शाळा (आकुर्डी), कल्पना इंग्लिश मीडियम स्कूल (निगडी), जी. एस. के. इंग्लिश मीडियम स्कूल (जाधववाडी), सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल (भोसरी), किड्स परेडाइज इंग्लिश मीडियम स्कूल (चोली), इन्फंट जिजस प्रायमरी स्कूल (कासारवाडी), डेलमॉन्ट इंग्लिश मीडियम स्कूल, एस. पी. स्कूल (वाकड), सेन्ट मायकेल्स ज्युनियर ऑर्किड स्कूल (पिंपळे गुरव), बी. टी. मेमोरियल स्कूल (काळेवाडी) या केंद्रांचा समावेश आहे.










Leave a Reply