Dehu News : देहूत वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Pckhabar- वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना विठ्ठलवाडी, देहू येथे घडली.
रेविकुमार सदयांडी (वय ४९) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांचे मेहुणे शिबु देवदास (वय ४२, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी मंगळवारी (दि. २२) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास रेविकुमार हे दुचाकीवरून चिखली ते देहूगाव प्रवास करत होते. ते एच. पी. पेट्रोल पंप, विठ्ठलवाडी या ठिकाणी आले असता, वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये रेविकुमार यांचा मृत्यू झाला.










Leave a Reply