Pimpri News : महापालिकेमार्फत “वेस्ट टू आर्ट” या उपक्रम; टाकाऊ वस्तूंचा वापर करुन विविध कलाकृती तयार

Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत “वेस्ट टू आर्ट” या उपक्रमांतर्गत टाकाऊ वस्तूंचा वापर करुन विविध कलाकृती तयार करण्यात येत आहे.
सदर कलाकृती या स्वाती कोरडे, पलाश सोसायटी, वाकड यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी व कासारवाडी येथील विद्यार्थ्यांमार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत. सदर कलाकृतींपैकी काही कलाकृती (पेंटींग्स) ह्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी येथील इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या असून आज महानगरपालिका मुख्यालयातील दुस-या मजल्यावर पेंटींग्स लावण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार एकूण १८ पेंटींग्सचे मुख्यालयाचे इमारतीमध्ये अनावरण करण्यात आले.
सदर अनावरण कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के अनिल रॉय, जनसंपर्क विभागाचे माहिती अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, स्वाती कोरडे, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, प्राध्यापक क्षिरसागर तसेच सर्व कलाकृती तयार करणारे विद्यार्थी आणि मे.केपीएमजी या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महानगरपालिकेमार्फत सदर उपक्रम निरंतरपणे राबविण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने सदर कलाकृती महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतींमध्ये देखील लावण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय यांनी दिली.










Leave a Reply