Maval News : तळेगाव, लोणावळा नगरपरिषद निवडणुकीचा प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव २ मार्चला होणार सादर

Maval News : तळेगाव, लोणावळा नगरपरिषद निवडणुकीचा प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव २ मार्चला होणार सादर

 

Pckhabar- कोरोनामुळे लांबणीवर गेलेल्या नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे २ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. नगर परिषदांच्या प्रभागांची संख्या, प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन न नकाशा यांचा यात समावेश आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सदस्यांचा कार्यकाल ६ जानेवारी २०२२ रोजी संपला आहे. तेव्हापासून नगरपरिषदेची सर्व सूत्रे प्रांताधिकारी संदेश शिर्के केले जातील. यांच्याकडे आहेत, तर लोणावळा नगरपरिषदेची मुदत १० जानेवारी २०२२ रोजी संपली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठीचा प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव २ मार्च २२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. त्यास जिल्हाधिकारी ७ मार्च रोजी मान्यता देतील. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे माहितीसाठी व हरकती, सूचना मागविण्याकरिता १० मार्च रोजी प्रसिद्ध
केले जातील.

नागरिकांना या प्रभाग रचनेवर १७ मार्चपर्यंत हरकती नोंदविता येतील. त्यावर जिल्हाधिकारी २२ मार्च रोजी सुनावणी देतील. २५ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्तांकडे अहवाल पाठवावा लागणार आहे. राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचनेस १ एप्रिल २०२२ रोजी मान्यता देईल, तर अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपरिषद वेबसाइटवर जिल्हाधिकारी ५ एप्रिल २२ रोजी प्रसिद्ध करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *