Chikhali Political News : शिवसेना महिला आघाडी संघटकपदी साधना काशिद

Pckhabar- शिवसेना महिला आघाडी प्रभाग क्रमांक १३ ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून प्रभाग संघटकपदी साधना नेताजी काशिद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आणि उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उपविभाग संघटिका अनिता तळेकर, पल्लवी हेपट यांची, तर शाखा संघटकपदी अनिता कांबळे, तुळशी सांगडे, महानंदा सपकाळ आणि कविता यादव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनाही नियुक्ती पत्र देण्यात आले.
मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती प्रभाग क्रमांक १३मधील महिलांचे संघटन करण्यात येईल. आगामी निवडणुकीत या प्रभागावर शिवसेनाचा भगवा फडकण्यासाठी मेहनत घेण्यात येईल. महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्य जदेण्यात येईल, अशी ग्वाही साधना काशिद यांनी दिली.










Leave a Reply