Maval News : स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रम

Pckhabar- २२ फेब्रुवारी हा स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन दिन/Thinking Day श्रीमती शांती देवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा लोणावळा स्काऊट गाईडच्या उपाध्यक्षा रत्नप्रभा गायकवाड, शशिकांत भोसले, श्रावणी कामत, आशिष जहाँगिर , जयश्री कांबळे, सायली जोशी, हेमलता शर्मा, पूर्वा गायकवाड आदी सदस्य तसेच शिक्षक प्रतिनिधी कोकणे सर , घाडगे सर , शिरसाट सर , श्री. इंगवले व विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्या क्षिरसागर मॅडम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट शिक्षक मनोहर भोसले यांनी केले.
नियोजन राजश्री कांबळे यांनी केले. आभार खेडकर सर यांनी मानले.










Leave a Reply