Pimpri News : गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ

Pimpri News : गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ

Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी पद्धतीने नियमित करण्यासाठी अर्ज करण्याकरिता आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. २० एप्रिल २०२२ पर्यंत नागरिकांना अर्ज करता येतील अशी माहिती बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. दरम्यान, २० डिसेंबर २०२१ पासून आजपर्यंत दोन महिन्यांत नियमितीकरणासाठी केवळ ५१० अर्ज आले आहेत.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील महापालिका हद्दीतील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००९ मध्ये सुधारणा केली. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार आहेत.

महापालिकेने २० डिसेंबर २०१२ ते २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत नागरिकांकडून अर्ज मागविले होते. या कालावधीत ५१० अर्ज आले आहेत. गुंठेवारीची योजना यशस्वीरीत्या राबविण्याकरिता अर्ज स्वीकारण्यास २० एप्रिल २०२२ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *