Chikhali News : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली : खासदार संभाजीराजे

Chikhali News : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली : खासदार संभाजीराजे


Pckhabar- छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. आज मात्र आपल्या राज्यात जातीचे समीकरण जुळवले असल्याचे दिसून येत आहे. अशी खंत खासदार युवराज संभाजी महाराज यांनी चिखली येथे व्यक्त केली .

समीर मळेकर यांच्या पुढाकाराने
श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथील ओम शिव शंभू पेट्रोलियम वरील छत्रपति श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यासमूह शिल्पाचे अनावरण खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले व आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हभप पुंडलिक महाराज देहूकर, संत नामदेव महाराज यांचे 17 वे वंशज हभप ज्ञानेश्वर महाराज नामदास, संत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज हभप योगिराज महाराज गोसावी, माजी महापौर राहुल जाधव, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे उप सरव्यवस्थापक मनीष अग्रवाल, वरिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक मंगेश डोंगरे, संतपीठाच्या संचालिका स्वाती मुळे,मराठा महासंघाचे समन्वयक शरद पोखरकर, संतपीठाचे संचालक हभप राजू महाराज ढोरे, ओम शिव शंभू पेट्रोल पंपाचे संचालक आयोजक समीर मळेकर उपस्थित होते.
खासदार छ.संभाजी म्हणाले कि, मळेकर कुटुंबाने छत्रपती व संतांच्या वंशजांना एकत्रित आणून एक भक्ती शक्तीची अनुभूती दिली आहे.महाराष्ट्र हि साधुसंतांची भूमी आहे. इतर राज्यांनी आपला आदर्श घ्यावा अशी संस्कृती असताना जातीपातींचे समीकरणे जुळवून राजकारण होत आहे.
मी केवळ मराठ्यांसाठी लढा देत नाही तर बारा बलुतेदार, अठरापगड जातीना एकत्रित करण्याचे काम मी करीत असून काही मंडळींना पचत नाही. यामुळे काहीजण माझ्यावर टीका करतात. शाहू-फुले- आंबेडकर यांनी दिलेला समतेचा विचार समाजात पेरायचा आहे.असे शेवटी त्यांनी सांगितले.
आमदार लांडगे म्हणाले कि,छत्रपती यांच्या घराण्याबद्दल मनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.चिखली गावाला एक सांप्रदायिक परंपरा आहे. चिखली गावात संतपीठाची स्थापना होत असल्याने लोकामध्ये सांप्रदायिक शिक्षणाची जोड देण्याचे कार्य होत आहे.
समीर मळेकर कुटुंबाकडून जगतगुरू तुकाराम महाराजांच्या चेन्नई येथे जाणाऱ्या पादुकानसाठी 1किलो चांदी छत्रपतीच्या हस्ते तुकाराम महाराजांचे वंशज पुंडलिक महाराज देहूकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओम शिव शंभू पेट्रोलियमचे संचालक समीर मळेकर यांनी केले.
खा. छत्रपती संभाजीराजे यांना बाळासाहेब मळेकर व सुदाम मळेकर यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची पगडी,विना,टाळ,चिपळ्या देऊन सन्मानित करण्यात आले . छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना तानाजी मालुसरे यांची पगडी व तलवार देण्यात आली . पुंडलिक महाराज देहूकर यांचा सन्मान नथू मळेकर व नामदेव मळेकर यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची गाथा व टाळ देऊन करण्यात आला. तसेच ज्ञानेश्वर महाराज नामदास व योगीराज महाराज गोसावी यांचा सन्मान स्वप्नील मळेकर,बाबाजी मळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास चिखली गावातील ग्रामस्थ तसेच नातेवाईक व पंचक्रोशीतील सर्व तरुण मावळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय तरटे, निलेश पडवळ तर आभार धनंजय भालेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *