Chikhali News : शिव स्वराज्य रिक्षा स्टँड नामफलकाचे अनावरण

दिव्यांगांसह, निराधार जेष्ठांना मोफत प्रवास
Pckhabar-शिवसेना भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती निमीत्त चिखली ताम्हाणे वस्ती, शिवरकर चौक येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शिव स्वराज्य रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे शिवसेना महिला आघाडी विभाग संघटिका जनाबाई गोरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशीद, सर्जेराव भोसले, राहुल भोसले, रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष सचिन कराळे, बाळासाहेब नाखाडे, सुर्यकांत देशमुख, संजय गाढवे, सचिन शिवरकर, विजय शिवपुजे, चंद्रकांत माने, चंद्रकांत जाधव, देवा कुलकर्णी, अशोक जाधव, गणेश बिलोनकर, चेतन सावंत, शाम बुईके, नाना जाधव, मनोहर घुगे,आकाश वखरे, मंगेश कोल्हे, नितीन राठोड आदी उपस्थित होते.
शिव स्वराज्य रिक्षा स्टँडच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ६५ वर्षांवरील निराधार आणि दिव्यांग नागरिकांना मोफत प्रवासी सेवा देण्यात येणार आहे.
रावसाहेब थोरात, संघटक, शिवसेना










Leave a Reply