Pimpri news शहरात कोरोनाचे 978 नवे रूग्ण , 20 जणांचा मृत्यू , 705 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाचे 978 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 34 हजारी ओलांडली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 705 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 34 हजार 447 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 5 हजार 94 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात शनिवारीअखेर 24 हजार 377 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत शहरातील 599 तर शहराबाहेरील 127 जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी 1 हजार 680 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 238 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 2 हजार 645 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील 17 हजार 954 घरांना भेटी देऊन 58 हजार 271 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.










Leave a Reply