Bhosari News: “रोटरी क्लब चे मानवसेवेचे कार्य कौतुकास्पद” – आ. महेश दादा लांडगे
Pckhabar: भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर , नारायण सेवा संस्थान व मातोश्री बाल संगोपन केंद्र या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कृत्रिम अवयव वितरण शिबीर घेण्यात आले.या शिबिरात सुमारे १०० जणांची तपासणी करण्यात येऊन त्यांना कृत्रिम हात, पाय , कॅलिपर यांचे मोफत वाटप करण्यात आले.या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधान सभेचे आमदार महेशदादा लांडगे , रोटरीचे प्रांतपाल रो. पंकज शाह , स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन भाऊ लांडगे , माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख उपस्थित होते. या वेळी बोलताना आ. महेशदादा लांडगे म्हणाले ,” रोटरी क्लबचे मानवसेवेचे अनेक उपक्रम सतत चालू असतात त्यांचे हे उपक्रम कौतुकास्पद आहेत . प्रा. पगारिया हे नेहमीच मानवसेवेमध्ये अग्रेसर असतात . त्यांच्या पासून आम्हाला प्रेरणा मिळत असते.” रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकजजी शाह व प्रशांतजी देशमुख तसेच राजगुरूनगर क्लबचे अजित वाळुंज, नारायण सेवा संस्थान चे मुकेश शर्मा यांना धन्यवाद.
या वेळी प्रांतपाल पंकज जी शहा व प्रशांत देशमुख यांनी नारायण सेवा संस्थेच्या कार्याचे कौतुक करून अशा प्रकारचे कार्यक्रम सर्वच रोटरी क्लब च्या वतीने राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. श्री. मुकेश शर्मा यांनी नारायण सेवा संस्थेच्या कार्याची माहिती दिली . यावेळी अध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया यांनी प्रास्ताविक केले व रो. अजित वाळुंज यांनी प्रास्ताविक केले.तसेच रो. रामदास जैद यांनी आभार मानले. रो. भूषण तोशनीवाल यांनी स्वागत गीत म्हणून कार्क्रमाची सुरुवात केली. सूत्रसंचालन रो. पी. एम. जैन यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात रोटरी क्लबचे कोषाध्यक्ष प्राचार्य सदाशिव कांबळे , प्रा. सचिन पवार , प्रा. पांडुरंग भास्कर , तसेच रो. अविनाश कोहिनकर , रो. गणेश घुमटकर , रो. जितेंद्र गुजराथी आदींनी पुढाकार घेतला.
Bhosari News: “रोटरी क्लब चे मानवसेवेचे कार्य कौतुकास्पद” – आ. महेश दादा लांडगे










Leave a Reply