Dehugaon News : स्वर्गीय अमित शिवळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गरजू नेत्र रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया

Dehugaon News : स्वर्गीय अमित शिवळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गरजू नेत्र रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया

देहूगावातील प्रसिद्ध इंद्रायणी नेत्र रूग्णालयात होणार शस्त्रक्रिया

Pckhabar- कर्तव्य फाऊंडेशनचे सक्रिय सभासद, सामाजिक कार्यकर्ते कै. अमित बाळासाहेब शिवळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गरजू आणि गरीब रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशा गरजू आणि गरीब रुग्णांनी 7040239257 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इंद्रायणी नेत्र रूग्णालयाचे डॉ. स्वप्निल चौधरी, डॉ. विद्याताई मापारी-यादव आणि कर्तव्य फाऊंडेशन वतीने करण्यात आले आहे.

कर्तव्य फाऊंडेशनचे सक्रिय सभासद अमित शिवळे यांची आज (शनिवार) जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त कर्तव्य फाऊंडेशनच्या सदस्यांनी शिवळे यांना आदरांजली म्हणून गरजू आणि गरीब रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्याचा अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतला आहे.

या नेत्र रूग्णांच्या देहूगावातील प्रसिद्ध इंद्रायणी नेत्र रूग्णालयात मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. अशा गरजू आणि गरीब रुग्णांनी 7040239257 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कर्तव्य फाऊंडेशन आणि इंद्रायणी नेत्र रूग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *