Big political News : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट, युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख

Big political News : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट, युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख

Pckhabar-आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी भोसरीतील नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट, युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी गव्हाणे यांची नियुक्ती केली आहे.

तीनही विधानसभा मतदारसंघानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आणि भोसरी मतदारसंघातील नेहरूनगर येथील नगरसेवक राहुल भोसले यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

युवकच्या शहराध्यक्षपदी इम्रान शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

युवकच्या कार्याध्यक्षपदी पिंपरी मतदारसंघातून निलेश निकाळजे, चिंचवड मतदारसंघातील प्रसन्न डांगे आणि भोसरीतील योगेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.

महिला कार्याध्यक्षपदी चिंचवड मधील ज्योती गोफणे, काळभोरनगर येथील सविता धुमाळ आणि सांगवीतील उज्जवला ढोरे यांची निवड करण्यात आली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *