Rto News : कर थकविलेल्या वाहनांचा आरटीओकडून बुधवारी लिलाव

Rto News : कर थकविलेल्या वाहनांचा आरटीओकडून बुधवारी लिलाव

Pckhabar- मोटार वाहन कर न भरलेल्या आणि मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ई-लिलाव बुधवार (दि. 16) सकाळी 11 वाजता होणार आहे.

वाहनमालकांना लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी दिली आहे. लिलाव करण्यात येणारी वाहने वाधेश्वर पार्किंग येथील आवारात पाहणीसाठी उपलब्ध आहेत. ई-लिलावात एकूण 34 वाहने उपलब्ध आहेत.

यात टूरिस्ट टॅक्सी, ट्रक बस हलकी परिवहन वाहने, रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 11 ते 14 फेब्रुवारी 2022 सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात 50 हजार रुपये रकमेचा ‘आर टी ओ पुणे’ या नावाने अनामत धनाकर्षासह नावनोंदणी करून प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी. ई लिलावात जीएसटीधारकांनाच सहभागी होता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *