Pimpri Crime News : महापालिकेला बोगस बँक गॅरंटी देणाऱ्या मे. सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीवर गुन्हा

Pimpri Crime News : महापालिकेला बोगस बँक गॅरंटी देणाऱ्या मे. सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीवर गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांच्या संबंधित कंपनी

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिका अ व ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे आणि बनावट स्वाक्षरी करुन प्रशासनाची फसणूक केली. तसेच, परफॉरमन्स सिक्युरिटी डिपॉझिट रकमेपोटी सुमारे 7 कोटी रुपयांच्या बनावट बँक गॅरंटी सादर केल्याप्रकरणी मे. सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, रस्ते सफाई कंत्राटाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील माजी महापौराच्या निकटवर्ती व्यक्तीचा सहभाग असल्याचे समजते.

याबाबत महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त यांनी माहिती दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिके तर्फे आरोग्य विभागामार्फत अ व ब क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत रस्त्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. यामध्ये लघुत्तम दर निविदा धारक मे. सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा.लि. पुणे यांनी निविदा अटी शर्तीनुसार महापालिकेस सादर करावयाच्या परफॉरमन्म सिक्युरिटी डिपॉझिट स्कमेपोटी एकूण 6 कोटी 90 लाख 31 हजार रूपयांची स्टेट बैंक ऑफ इंडिया एमजी रोड फोर्ट मुंबई गॅरंटी महापालिकेला सादर केलेल्या होत्या. तथापि, सदर बँक गॅरंटी या बनावट असल्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिकेमार्फत प्रत्यक्ष शहानिशा केली असता सादर केलेल्या बँक गॅरंटी या बनावट असलेने निष्पत्र आहे. सबब में सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. पुणे यानी सदर प्रकरणी महानगरपालिकेची खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केली.

पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *