Talegaon Dabhade News : भारतरत्न स्व. लतादिदी मंगेशकर यांना संगीत मैफिलीतून वाहण्यात येणार श्रद्धांजली
जनसेवा विकास समिती आणि भगत बिल्डर्सतर्फे आयोजन

Pckhabar- जनसेवा विकास समिती आणि भगत बिल्डर्स यांनी संयुक्त विद्यमाने भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना संगीतपूजक ‘मेरी आवाज ही पहचान है’ या संगीत श्रद्धांजली मैफलीतून स्वरसुमनांची आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
तळेगाव दाभाडे यशवंतनगरमधील गोळवलकर गुरुजी मैदानावर कोरोना नियमांचे पालन करीत उद्या (शनिवार) सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये ‘मेरी आवाज ही पहचान है’ या संगीत श्रद्धांजली मैफलीतून नादब्रह्म संगीतालयचे कलाकार लतादीदींना त्यांनी गायलेल्या गाणी सादर करून लतादिदी यांना आदरांजली वाहणार आहेत.
या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेल्या निवडक प्रार्थना, आनंदगण या नावाने संगीतबद्ध केलेल्या गीतरचना, देशभक्तीपर गीतांची झलक नामवंत गायक व संगीतकार विनायक लिमये, संपदा थिटे, लीना परागे, डॉ. सावनी पारगे, विराट सवई, स्वप्नील झलके, अंकुर शुक्ल, कीर्ती घाणेकर हे कलाकार सादर करणार आहेत.
मंगेश राजहंस, प्रवीण ढवळे, दीप्ती कुलकर्णी, ओमकार पाटणकर ते वादक कलाकार साथसंगत करणार असून डॉ. विनया केसकर निवेदन करणार आहेत.
संगीत रसिकांनी या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थिती लावून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे आणि नगरसेवक निखिल भगत यांनी केले आहे.










Leave a Reply