Dehu News : महिला आणि मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेणार : नगरसेविका पौर्णिमा परदेशी

Dehu News : महिला आणि मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेणार : नगरसेविका पौर्णिमा परदेशी

Pckhabar- कमी वजनाच्या मुलांसाठी आणि ॲनेमिया असणार्‍या महिलांसाठी लवकरच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथम नगरसेविका पौर्णिमा परदेशी यांनी नागरिकांना दिले.

तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथम नगरसेविका पौर्णिमा परदेशी आणि देहू राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशालीताई टिळेकर यांचे हस्ते आज (गुरूवार) अंगणवाडीतील लाभार्थींना चिक्कीचे वाटप करण्यात आले. तसेच नवजात बालकाला बेबी केअर किट देण्यात आले. त्यावेळी नगरसेविका परदेशी बोलत होत्या.

नगरसेविका पौर्णिमा परदेशी म्हणाल्या ”
गरोदर माता आणि बालकांसाठी राज्य सरकार विविध महत्वपूर्ण योजना राबवत असते. या योजनांचा गरजू मातांनी लाभ घेतला पाहिजे. तसेच यापुढील काळात कमी वजनाच्या मुलांसाठी आणि ॲनेमिया असणार्‍या महिलांसाठी लवकरच आपण मोफत आरोग्य शिबिराचे
आयोजन करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *