Dehu Election News : आमदार सुनील अण्णांनी शब्द पाळला; विक्रमी मतांनी निवडून आलेल्या रसिका काळोखे यांना उपनगराध्यक्ष पदाची दिली संधी!

Dehu Election News : आमदार सुनील अण्णांनी शब्द पाळला; विक्रमी मतांनी निवडून आलेल्या रसिका काळोखे यांना उपनगराध्यक्ष पदाची दिली संधी!

 

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. त्यानंतर आज नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण तर उपनगराध्यक्ष पदासाठी रसिका स्वप्निल काळोखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चव्हाण आणि काळोखे यांच्या नावाची घोषणा होणे फक्त औपचारिकता बाकी आहे. उद्या (शुक्रवार) निवडणूक निर्णय अधिकारी घोषणा करणार आहेत.

तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, दोन अपक्ष, एक भाजपचा नगरसेवक निवडून आला आहे तर दोन्ही अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

देहूगाव ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांनी उपसरपंच असताना विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विकास कामाचा, सामाजिक कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला. कोरोनाच्या जागतिक महामारीत काळोखे यांनी गोर- गरिब नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षात असलेले काळोखे यांना मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली. आमदार शेळके यांच्या शब्दाचा मान राखत तसेच त्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या स्वप्निल आप्पा काळोखे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमदार शेळके यांनी चांगल्या पदावर काम करण्याची संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांच्या पत्नी रसिका काळोखे यांना देहू नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली.

रसिका स्वप्निल काळोखे यांनी या निवडणूकीत भाजपच्या उमेदवार
शितल मराठे यांचा तब्बल 552 मतांनी
पराभव केला. रसिका काळोखे यांना 733 तर भाजपच्या शितल मराठे यांना फक्त 188 मते मिळाली.

त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे रसिका स्वप्निल काळोखे यांना प्रथम उपनगराध्यक्ष पदासाठी संधी दिली आहे. त्यामुळे काळोखे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

याबाबत रसिका काळोखे यांचे पती स्वप्निल काळोखे म्हणाले ” आमदार सुनील अण्णांनी मावळ विधानसभा मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची त्यांनी पुर्तता केली आहे. आणि आताही करत आहेत. अण्णा म्हणजे शब्दाला जागणारे जनसेवक आहेत. त्यांनी आपल्याला दिलेल्या शब्द पाळला असून पत्नी रसिका काळोखे यांना प्रथम उपनगराध्यक्ष पदाची संधी दिल्याबद्दल आपण त्यांचा मनापासून आभारी आहे. त्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास नक्कीच सार्थ करून दाखवणार, अशी ग्वाही स्वप्निल काळोखे यांनी दिली.”

दरम्यान, देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण राखीव झाले होते.
अनुसूचित जाती या प्रवर्गातून प्रभाग क्रमांक तीन मधून पूजा दिवटे आणि प्रभाग क्रमांक 9 मधून स्मिता चव्हाण या निवडून आल्या आहेत. प्रथम नगराध्यक्ष पद मिळविण्यासाठी दिवटे आणि चव्हाण यांच्यात जोरदार रस्सीखेच निर्माण झाली होती. मात्र, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *