Pimpri News : महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक जाहीर
Pckhabar-कोरोनाची तिसरी लाट आल्याने पुढे ढकलेली पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. २५ फेब्रुवारी २२ रोजी मतदान होणार असून, त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड पालिकेमध्ये कर्मचारी महासंघ ही मान्यताप्राप्त संघटना आहे. या संघटनेत सहा हजार २०० सभासद आहेत. कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीची सन २२ ते २४ या २ वर्षांच्या कालावधीसाठीची निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीसाठी अर्जही दाखल झाले होते, परंतु कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. तिसऱ्या लाटेत प्रचंड रुग्ण वाढत होते. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी ही निवडणूक पुढे ढकलली होती.
आता शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १० ते ११ फेब्रुवारी २२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ११ फेब्रुवारी रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल. १४ फेब्रुवारी रोजी पॅनल प्रमुखाची निवड व चिन्हवाटप करण्यात येईल. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पालिका मुख्य इमारतीत मतदान होईल. त्याच दिवशी मतदान झाल्यानंतर मतमोजणी होणार आहे.










Leave a Reply