Maharashtra News :  पिंपरी महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त, अमरावती मनपा आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली

Maharashtra News :  पिंपरी महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त, अमरावती मनपा आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त आणि अमरावती महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकल्याची घटना आज दुपारी अमरावती येथील स्थानिक राजापेठ चौकात घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक राजापेठ चौकात  उड्डाणपुलाचे काम  चालू असून उड्डाणपूलावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी बडनेरचे आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा आग्रही आहे. मात्र अश्या प्रकारचा पुतळा उड्डाणपुलावर बसविण्यास वाहतूकीची कोंडी असतानाच त्याची विटंबना सुध्दा होऊ शकते म्हणून त्याला सर्वच राजकीय पक्षाचा विरोध आहे. मात्र स्वाभिमानी संघटनेचे  रवि राणा त्यांची पत्नी नवनीत राणा पुतळा बसविण्यासाठी आग्रह धरून आहे. या प्रकारामुळे गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच वाद सुरू आहे.अश्यातच मनपा आयुक्त आष्टीकर उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी  गेले होते.

मात्र, अचानक काही महिला या ठिकाणी पोहोचल्या त्यांनी चक्क आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली. संबंधित महिला या आपण शिवप्रेमी कार्यकर्ता असल्याचे सांगत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आष्टीकर सुध्दा हैराण झाले. त्यांना लगेच मोटारीत बसवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *