Pimpri Water News : विद्युत पुरवठा खंडीत; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
Pckhabar- रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा सकाळी 6 पासून खंडीत झालेला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा आज (बुधवार) विस्कळीत राहणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रविण लडकत यांनी केले आहे.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रावेत येथील पवना नदीवरील बंधाऱ्यातून पाणी उचलले जाते. त्यानंतर हे पाणी सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केल्यानंतर शहरभर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 400 केव्ही अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झाला आहे. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा सकाळी 6 पासून खंडीत झालेला आहे. MSEDCL मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. तथापी काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा आजचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांनी दिली आहे.










Leave a Reply