खडकी कँटोन्मेंट हद्दीत कोरोना रुग्ण संख्या हजाराच्या दिशेने
Pckhabar- खडकी कँटोन्मेंट परिसरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता हजाराच्या दिशेने पोहचण्याच्या मार्गावर आहे. यासह रुग्ण बरे होण्याचा दर ही अतिशय समाधानकारक असल्याने कँटोन्मेंट बोर्ड प्रशासनाकरिता ही एक स्वागर्ताह बाब मानली जात आहे.
कँटोन्मेंट परिसरातील कोरोना रुग्णांचा आकडा 914 वर पोहचला असुन त्यातील 27 रुग्णांचा मृत्यू झाला आह. 636 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या परिसरात एकुन 251 रुग्णांची नोंद असुन हे सर्व रुग्ण कँटोन्मेंट रुग्णालय तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनामुळे एक विद्यमान सदस्य एक माजी सदस्य तसेच एका कँटोन्मेंट कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. कँटोन्मेंट हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजाराच्या दिशेने पुढे वाटचाल करित आहे. या व्यतिरिक्त परिसरात रुग्ण बरे होण्याचा दर ही अतिशय समाधानकारक आहे.
कँटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात संशयितांचे स्वॅब तपासले जात आहेत. त्यामुळे दररोज रुग्ण संख्येत ही भर पडीत आहे. प्रशासन तसेच रुग्णालयाच्या वतीने कोरोनास आळा घालण्यासाठी योग्य ती उपाय योजना सुनियोजित पध्दतीने राबवली जात आहे. कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांनी तसेच व्यवसायिक व व्यापारी बंधुनी कोरोनास आळा घालण्या बाबत कँटोन्मेंट प्रशासनाच्या वतिने दिलेल्या शासकीय सुचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन खडकी कँटोन्मेंट परिसर कोरोनामुक्त करण्याकामी सहकार्य करावे असे आवाहन कँटोन्मेंट प्रशासनाच्या वतिने करण्यात आले आहे.
खडकी कँटोन्मेंट हद्दीत कोरोना रुग्ण संख्या हजाराच्या दिशेने










Leave a Reply