Dehu News : देहू नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश परंडवाल

Dehu News : देहू नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश परंडवाल
Pckhabar- तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश परंडवाल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी दिली.

देहू ग्रामपंचायतीचे रूपांतर होऊन प्रथमच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, दोन अपक्ष, एक भाजपचा नगरसेवक निवडून आला आहे तर दोन्ही अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, योगेश परंडवाल हे प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दणदणीत मतांनी निवडून आले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *