Pimpri Crime News : मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची 45 लाखांची फसवणूक
काॅलेज प्रमुखासह दोघांना अटक
Pckhabar- एका महिलेच्या मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने काॅलेज प्रमुखासह एका व्यावसायिकाने 45 लाख रुपये घेतले. मात्र, काॅलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. तसेच पैसेही परत केले नाहीत. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 2016 ते 2021 या कालावधीत घडला.
किरण सुवर्णा( रा. पिंपरी) आणि आय. एस. एन. आर काॅलेजचे प्रमुख देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपी किरण सुवर्णा फिर्यादी यांची मुलीचे एम.बी.बी.एस. करीता मेडीकल कॉलेज मध्ये अॅडमिशन करुन देतो असे सांगुन, फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. आरोपींनी संगनमत करुन, फिर्यादीचे मुलीचे मेडीकल कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी 45 लाख रुपये रक्कम देण्यास भाग पाडले. आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीचे अॅडमिशन न करता, फिर्यादीकडुन घेतलेले 45 लाख रुपये परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply