Dehu Political News : देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षाची शुक्रवारी निवड

Dehu Political News : देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षाची शुक्रवारी निवड

प्रथम नगराध्यक्ष होण्याचा कोणाला मिळणार बहुमान

नगरसेविका स्मिता चव्हाण, पूजा दिवटे
यांच्यात स्पर्धा

Pckhabar- देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवड येत्या शुक्रवारी होणार आहे. यासाठी देहू नगरपंचायतीची विशेष सभा 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. सभा हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

दरम्यान, देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण राखीव झाले आहे.
अनुसूचित जाती या प्रवर्गातून प्रभाग क्रमांक 3 मधून पूजा दिवटे आणि प्रभाग क्रमांक 9 मधून स्मिता चव्हाण या निवडून आल्या आहेत. प्रथम नगराध्यक्ष पद मिळविण्यासाठी दिवटे आणि चव्हाण यांच्यात रस्सीखेच निर्माण होणार आहे.

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार नामनिर्देशन पत्र व प्रतिज्ञापत्र देहू नगरपंचायत मुख्याधिकारी यांचेकडे आज (सोमवार) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत दाखल करावयाचे आहे. दुपारी 2 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत अवैद्य उमेदवारांची यादी नोटीस बोर्डवर लावली जाणार आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नामनिर्देशन फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांस अपिलाची मुदत देण्यात आली आहे.

नगराध्यक्ष निवडीनंतर लगेच होणार
उपनगराध्यक्ष

नगराध्यक्षांच्या निवडीनंतर त्याच दिवशी 11 फेब्रुवारी रोजी उपनगराध्यक्षांची निवड होणार आहे. त्यासाठी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे. पिठासीन अधिकारी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर उपाध्यक्षपदाचे नामनिर्देशन पत्राची छाननी करणे. छाननीनंतर 15 मिनिटे माघारीसाठी देण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतर लगेचच निवडणूक घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *