Nigdi Crime News : गजानन चिंचवडे यांच्या मृत्यूप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल

Nigdi Crime News : गजानन चिंचवडे यांच्या मृत्यूप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल
Pckhabar- खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्यामुळेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि भाजप नेते गजानन चिंचवडे यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा नऊ जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शकुंतला बाळू चिंचवडे, दिनेश बाळू चिंचवडे, राजेश बाळू चिंचवडे, महेश उर्फ सुनील बाळू चिंचवडे, ओमकार महेश चिंचवडे, संकेत दिनेश चिंचवडे, वंदना दिनेश चिंचवडे, पुनम महेश चिंचवडे आणि राजेश चिंचवडे यांच्या पत्नी (सर्व रा. चिंचवडेनगर चिंचवड गाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे (४५ रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचे पती गजानन चिंचवडे यांच्याविरोधात २५ जानेवारी २०२२ रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. तसेच, प्रसिद्धी माध्यमांमध्ये खोटी माहिती देऊन बदनामी करीत त्यांना मानसिक त्रास दिला. त्यामुळे गजानन चिंचवडे यांच्या मृत्यूस आरोपी कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

निगडी पोलीस तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *