Dehu News : चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

Dehu News : चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

कट्टा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pckhabar- देहूगावातील कट्टा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या
चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 700 पेक्षा अधिक विद्यार्थ्याने उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. विविध सहा गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. प्रत्येक गटातून पाच क्रमांक निवडण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांचा शनिवारी देहूगाव येथे बक्षीस वितरण करण्यात आले.

कट्टा मित्र मंडळाच्या वतीने गेल्या सोळा वर्षे सातत्याने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. चित्रकलेची ही स्पर्धा देहूगाव पंचक्रोशीतील सर्वांच्याच कौतुकाचा आणि सर्व कलावंतांचा आवडीचा विषय ठरली आहे. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक, श्रमिक गोजमगुंडे, आरोग्यक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक, डॉक्टर आयफाज मुलाणी, चित्रकार विश्वकर्मा चव्हाण, वरद हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. नवनाथ शेळके, चित्रकार सुनील हुंडारे, चित्रकार सुहास झेंडे, उद्योजक प्रशांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा सरचिटणीस सुनील कडूसकर, देहू चे माजी उपसरपंच सचिन साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात हा बक्षीस समारंभ संपन्न झाला. या स्पर्धेत बक्षीस मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे,
गट क्र. 1.(बालवाडी )
विषय -आईस्क्रीम
1)इशांत गणेश कोरडे
2)साईराज सचिन वगरे
3)आराध्या आदिनाथ मालपोटे
उत्तेजनार्थ :
1)वीरा योगेश भोंडवे
2)श्रद्धा रजपूत.
गट क्र. 2( 1 ली 2 री) विषय :आवडता प्राणी
1)सार्थक भागवत जती
2)स्वयंम प्रदीप पाटील
3)श्लोक संदीप बेलोशे /संस्कृती रमेश कंद
उत्तेजनार्थ 1)जान्हवी सुभाष तळपे 2)साईराज दळवी
गट क्र. 3 (3री 4थी ) विषय :मनातील शाळा
1)स्वरा सुहास झेंडे
2)स्वरा भरत नारायणकर
3)सोनाली विष्णू पाटील
उत्तेजनार्थ 1)शौर्या रणजित चौगुले
2)गौरी शांताराम कांगणे
गट क्र. 4 (5 वी ते 7 वी )
विषय :रंगपंचमी, होळीचा सन
1)परिक्रमा सुनील हुंडारे
2)आर्या विक्रम काळोखे
3)अनुष्का बाजीराव गायकवाड
उत्तेजनार्थ 1)अनुष्का अमोल झेंडे 2)श्रेया विवेक काळोखे
गट क्र. 5(8वी 10वी ) विषय :गडकिल्ले, ट्रेकिंग
1)सई संतोष हुंडारे
2)ज्ञानेश्वरी विजय झेंडे
3)समृद्धी सुरेश तुरकाने
उत्तेजनार्थ :1)दिव्या प्रविण कोलते
2)भक्ती दीपक हगवणे
विशेष सन्मान :आदर्श प्रदीपकुमार ससे (कोल्हापूर )
खुला गट :विषय (बैलगाडा शर्यत )
1)प्रणिल प्रकाश चव्हाण
2)अनुराग संजय चाफेकर
3)आम्रपाली संदीपान साबळे
उत्तेजनार्थ: 1)प्रियरंजन यादव
2)शहाजी बंडोपंत पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *