Sad News : गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

Sad News : गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

Pckhabar- गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. आज मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्या 93 वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.

लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसेच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.

गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांचे व्हेंटिलेटर तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र शनिवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले होते.

लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना  ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *