Pune News : भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की
Pckhabar- भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. मात्र, त्यांच्यावर स्वपक्षातील भ्रष्टाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळेच सोमय्या यांना आज पुण्यात शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागले. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमधील वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या सोमय्या यांना आयुक्ताची भेट न घेताच परतावे लागले. सोमय्या महापालिकेत येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसैनिक महापालिकेत जमले होते. मात्र सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशदारावर येणार असल्याची माहिती मिळताच सर्व शिवसैनिक नव्या इमारती समोर गेले.
सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराने आले. त्यानंतर जुन्या प्रवेशद्वारात असलेल्या शिवसैनिकांनी त्यांना पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढा अशी मागणी करत त्यांना अडविले. यातच गोंधळ वाढत गेल्याने काही समजण्याच्या आताच धक्काबुक्की सुरू झाली. त्यानंतर सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर लाथा बुक्क्या मारल्या. त्यामुळे सोमय्या जीव मुठीत घेऊन गाडीत बसावे लागले.










Leave a Reply