Pimpri News : पर्यावरणपूरक वाहन खरेदीकडे नागरिकांचा वाढता कल !
आतापर्यंत इलेक्ट्रिकमधील ७ हजार १३३ वाहनांची नोंदणी
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांची माहिती
Pckhabar- पर्यावरण संरक्षणासाठी
पर्यावरणपूरक वाहनांची खरेदी करण्याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचा कल वाढत आहे. शहरामध्ये गेल्या वर्षभरात सुमारे तीन हजार ई-मोटारसायकलची नोंदणी वाढली आहे. सन २०२०च्या तुलनेत गेल्या वर्षभरात जवळपास नोंदणीत चौपट वाढ झाली आहे. तर, इलेक्ट्रिक मोटारीच्या नोंदणीत पाचपटीने वाढ झाली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत इलेक्ट्रिकमधील ७ हजार १३३ वाहनांची नोंद झाली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आतापर्यंत ई- मोटारसायकल, ई-कार, ई-थ्री व्हिलर टेम्पो अशा इलेक्ट्रिकमधील ७ हजार १३३ वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये ६ हजार ३८९ ई-मोटारसायकलच्या नोंदणीचा समावेश आहे. २०१९ मध्ये केवळ ४५३ इलेक्ट्रिक मोटारसायकलची नोंदणी झाली होती. २०२० मध्ये ही संख्या वाढून १०२० इतकी नोंदणी झाली. तर, २०२१ या वर्षात तब्बल ३ हजार ९७७ ई-मोटारसायकलची नोंदणी झालेली आहे. म्हणजेच २ हजार ९५७ मोटारसायकलची नोंदणी वर्षभरात वाढली आहे. २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये चौपट नोंदणी वाढली आहे. तर, गेल्या २१ दिवसांत ४८० ई-मोटारसायकलची नोंद झाली आहे. उप- प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ४७८ इलेक्ट्रिक कारची नोंदणी झालेली आहे.
इलेक्ट्रिक कारची नोंदणी करण्याचे प्रमाण कमी असले तरी २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये पाचपटीने नोंदणी वाढली आहे. २०२० मध्ये केवळ ६७ इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली होती, तर २०२१ मध्ये ३२० इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली. गेल्या २१ दिवसांत १० इलेक्ट्रिक कारची नोंदणी करण्यात आली आहे. २०१९ मध्ये एकाही इलेक्ट्रिक थ्री व्हिलर टेम्पोची (मालवाहतूक) नोंद झालेली नव्हती. २०२० झाली आहे. मध्ये ८१ इलेक्ट्रिक थ्री व्हिलर टेम्पोंची नोंद झाली.
” पर्यावरणपूरक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत इलेक्ट्रिकमधील ७ हजार १३३ वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ६ हजार ३८९ ई-मोटारसायकल आहेत. तर, ४७८ इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त अन्य प्रकारातील वाहनांचीही नोंद झालेली आहे.”
अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड,










Leave a Reply