Pune political News : माझ्याकडे असलेली सीडी नक्की येणार : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे भाष्य
Pckhabar- राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ”माझ्या मागे ईडी लावली तर सीडी बाहेर काढीन,” असे विधान केले होते. या विधानानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र, बोलल्याप्रमाणे खडसे यांनी सीडी अद्याप लावलेली नाही. मात्र, खडसेंनी सीडी लावण्याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे खडसेंच्या त्या सीडीमुळे राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात खडसे यांनी आपण सीडी लवकरच लावणार असल्याचे सांगून विरोधकांची झोप उडवली आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता खडसे पत्रकारांशी बोलत होते. ईडीची चौकशी आणि विविध आरोपांवर खडसे म्हणाले, पुरावे न देता फक्त आरोप करायचे. तुम्हाला पुरावे देऊन चौकशी करायला कोणी अडवलं आहे का? भाजपमधील नेत्यांची चौकशी होत नाही, जसे की ते स्वच्छ आहेत. हे चुकीचे आहे.
ओबीसी आरक्षणावर ते म्हणाले, ओबीसी आरक्षण न मिळण्याला भाजप सरकार आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. केंद्र सरकारने वेळेवर इम्पेरिकल डेटा मिळाला असता राज्य सरकारला काही करता आले असते. ओबीसींवर अन्याय होतोय ही वस्तुस्थिती असल्याचे खडसे शेवटी म्हणाले.










Leave a Reply