Talegaon Dabhade News : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समिती सदस्यपदी विलास काळोखे, किरण ओसवाल यांची नियुक्ती
Pckhabar- रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
आज तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी अध्यक्ष नितीन मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. उन्मेश गट्टे यांच्या हस्ते जागरुक वाचक कट्टा समूहाचे सदस्य व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे , रोटरीयन्स किरण ओसवाल यांना रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.
तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र हे मावळ तालुक्यातील सर्वाधिक लसीकरण करणारे केंद्र ठरलेले आहे. अनेक नागरिकांना तेथे कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण करून करून देण्यात आलेले आहे. तेथील वाढती संख्या व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पोहोचावे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चांगल्या सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी अवगत तंत्र ज्ञान असलेले साधन सामुग्री साठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे व पदाधिकारी किरण ओसवाल यांनी सांगितले आहे.
त्याप्रसंगी रोटरी क्लबचे ऑफ तळेगाव दाभाडे सीटी संस्थापक अध्यक्ष तसेच नवनिर्वाचित रुग्ण कल्याण समिती सदस्य विलास काळोखे ,पदाधिकारी किरण ओसवाल, पदाधिकारी संतोष लोणकर केंद्रप्रमुख डॉ. उन्मेश गट्टे, डॉ.राजेंद्र मोहिते यांच्या समवेत नवनिर्वाचित समिती सदस्य पदी नियुक्त झालेले तानाजी मराठे व इतर मान्यवर उपस्थित होते.










Leave a Reply