Talegaon Dabhade News :
तळेगाव-चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचे काम वेगाने करा : आमदार सुनील शेळके
Pckhabar- तळेगाव-चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना आमदार सुनील शेळके यांनी आज ( शुक्रवार) अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आमदार शेळके यांनी तळेगाव दाभाडे शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी मुख्याधिकारी सतीश दिघे, नगरसेवक निखील भगत, सुदर्शन खांडगे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, माजी नगरसेवक सुरेश धोत्रे, संदीप शेळके, अशोक भेगडे, अनिकेत भेगडे, आशिष खांडगे आदि. पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
स्टेशन भागासह यशवंतनगर, वतननगर, राजगुरव कॉलनी, स्वराजनगरी, म्हाळस्कर वाडी, हरणेश्वर कॉलनी तसेच MSEB कडे जाणारा रस्ता, भुयारी गटर, पाणी योजना या कामांची देखील पाहणी केली. ही सर्व कामे होत असताना कामांचा दर्जा उत्कृष्ट असावा,अशा ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत. स्टेशन भागाला पाणी पुरवठा होत असलेल्या इंद्रायणी नदीवरील जॅकवेलच्या ठिकाणची पाहणी केली. या भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. जॅकवेलच्या जवळच सांडपाणी सोडण्यात येत असल्याने दूषित पाणीपुरवठा या भागात होत आहे.त्यामुळे भविष्यातील विचार करता आंद्रा धरणातून थेट पाईपलाईन द्वारे पाणी आणण्याचे प्रयोजन आहे.त्यासाठी सर्वेक्षण करून आराखडा बनविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
रस्ते,पाणी, सांडपाणी व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधा शहरातील नागरिकांना मिळाल्या पाहिजेत. यासाठी संबंधित विकासकामे प्राधान्यक्रमाने करण्यावर भर असल्याचे आमदार शेळके म्हणाले.










Leave a Reply