Pimple Gurav News : राजेंद्र जगताप व अमरसिंग आदियाल यांच्यामुळे टळली मोठी दुर्घटना

Pimple Gurav News : राजेंद्र जगताप व अमरसिंग आदियाल यांच्यामुळे टळली मोठी दुर्घटना

Pckhabar-पिंपळे गुरव मोरया पार्क लेन नं 5 याठिकाणी शुक्रवारी दुपारी अचानक घरगुती गॅस गळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप व सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला कळविल्याने मोठी दुर्घटना टळली.
अचानक गॅसगळती झाल्याने संपूर्ण इमारतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप व सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांनी तात्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. मात्र, रस्ता अरुंद असल्याने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी जाऊ शकली नाही. त्यामुळे अमरसिंग आदियाल हे अग्निशामक दलाच्या जवानांना आपल्या गाडीत घेऊन आले. सदर इमारतीमधील नागरिकांना घाबरून न जाता शांत राहण्याचे आवाहन केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व तपासणी करून गॅस सिलेंडर मोकळ्या जागेत आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
याबाबत इमारतीमधील नागरिकांनी अग्निशामक दलाचे जवान, तसेच राजेंद्र जगताप व अमरसिंग आदियाल यांचे आभार मानले. यावेळी उद्योजक शंतनू डोळस, सामाजिक कार्यकर्ते शैलेश दिवेकर, बबलू चकाले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *