Election News : महापालिका निवडणूक प्रक्रियेला वेग ; प्रभाग रचनेच्या हरकती, सूचनांच्या सुनावणीसाठी अनिल कवडे यांची नियुक्ती

Election News : महापालिका निवडणूक प्रक्रियेला वेग ; प्रभाग रचनेच्या हरकती, सूचनांच्या सुनावणीसाठी अनिल कवडे यांची नियुक्ती

Pckhabar- महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकती, सूचनांच्या सुनावणीसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती, सूचना नोंदविण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी दिला आहे. या हरकतींवर २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

सुनावणीवेळी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी यांच्यासमक्ष सुनावणी घ्यायची आहे. २ मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह हा आराखडा निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवार अखेर अवघ्या ३ हरकती दाखल झाल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *