Dehu Social News : आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचातर्फे गरजू, हुशार
विद्यार्थिनीला लॅपटॉप भेट
Pckhabar- देहूगावातील कु.मोनिका यादव या बी.सी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या पत्नी सौ. सारिका ताई शेळके यांच्या हस्ते आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच यांच्या वतीने लॅपटॉप भेट देण्यात आला.
मोनिका अतिशय प्रतिकूल स्थितीतून शिक्षण घेत आहे. स्वतः नोकरी करून आपल्या कॉलेजचा खर्च सांभाळीत आपल्या कुटुंबालाही हातभार लावीत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन तिच्या या संघर्षमय प्रवासात व शैक्षणिक कार्यात सहकार्य करण्यासाठी आमदार सुनिलअण्णा शेळके युवा मंच यांच्या वतीने लॅपटॉप भेट देण्यात आला.
यावेळी हा लॅपटॉप भेट दिल्यानंतर मोनिकाने अतिशय भावनिक होऊन,”आपण दिलेली ही भेट माझ्या जीवनाला प्रेरणा देणारी व जीवनाच्या या अडचणीच्या काळात मला जिद्दीने संघर्ष करायला बळ देणारी आहे, अशा भावना तीने व्यक्त केल्या.
सारिका ताई यांनीही मोनिकाच्या या जिद्दीचे कौतुक करीत तिच्या जीवन प्रवासाला सदिच्छा देवून
भविष्यातही तुझ्या शैक्षणिक कार्यात असेच सहकार्य आमचे सदैव राहील असे विश्वासाने सांगितले.
याप्रसंगी देहूचे माजी उपसरपंच सचिन कुंभार,मा.उपसरपंच अभिजीत काळोखे, विशाल झेंडे, प्रा. विकास कंद, दिनेश साळुंके उपस्थित होते.










Leave a Reply