पिंपरी-चिंचवड शहरात आज 990 नवीन रुग्णांची नोंद, 1219 डिस्चार्ज, 13 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 919 आणि पालिका हद्दीबाहेरील 71 अशा नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 33 हजार 484 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1219 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये
भोसरी, निगडी, मोशी, तळवडे, रहातनी, चिंचवड, थेरगाव, दापोडी, देहूरोड आणि जुन्नर येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
शहरात आजपर्यंत 33 हजार 484 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 23 हजार 672 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 549 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 126 अशा 675 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5512 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.










Leave a Reply